इंग्रजीत राष्ट्रवादाला Nationalism तर देशभक्तिला Patriotism म्हटले जाते. ह्या दोंहोत खूप फरक आहे हे माहीत असूनही दुर्लक्ष करणारा मोठा गट आपल्या भारतातही आहे. ह्याच मुद्द्यावरून पाश्चात्य देशांत खूप चर्चा घडून काल पुढे सरकलेला दिसून येतो. हाच फरक लक्षात घेणे फार गरजेचे आहे. तत्पूर्वी आपण अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची व्याख्या व इतिहास हा पाश्चात्य राष्ट्रवादापेक्षा भयंकर भिन्न आहे.
राष्ट्रवादाचा अभ्यास करतांना मी दोन दृष्टिकोण वापरले जे इतिहासाचा अभ्यास करतांना वापरले जातात. एक इतिहास हा वरवर जरी चक्रासारखा दिसला तरी त्याला एक गति आहे. तो प्रगतशील आहे. दोन, परिस्थिति निर्माण झाली की गुण निर्माण होतात. किंवा जुने पुन्हा पुनर्जिवित होतात. ( जे आजचे डावे विसरलेले दिसतात.). राष्ट्रवाद हा पुनर्जिवित झालेला आहे. (ही स्थिति फ़क्त भारतातच नव्हे तर सबंध जगात निर्माण झाली आहे.). ही आजची गरजच आहे. मात्र सबंध मानवजातित व तत्निर्मित समाजात एवढी क्षमता असते की निर्माण झालेल्या गुणाला आपल्या स्वार्थापोटी हवे तसे वळण देऊ शकतात. कधी हा राष्ट्रवादी गुण बरेच समर्पक व अपेक्षित बदल घडवून आणतो. तर कधी विध्वंसासही कारणीभूत ठरू शकतो. जसे की दुसऱ्या महायुद्धात जर्मनीमधे घडले.
प्रथम आपण राष्ट्रवादाला जागतिक दृष्टिकोनातून बघुयात. सिडने हर्रिस ह्या विचारवंताच्या मते Patriotism म्हणजेच देशभक्ति ही एखाद्या देशाच्या virtues गुणांविषयी अभिमान बाळगण्यात आहे. आणि तसे करतांनाच उणीवा भरुन काढण्यासाठी धडपडणे होय. देशभक्ति ही स्वताच्या देशाचा अभिमान बाळगतांनाच इतरही देशांचे गुण व त्यांच्या देशभक्तिच्या विधायक व्याख्येचा आदर करणे होय. हेच मत व पुढे राष्ट्रवादाविषयी मी सांगणारे तेच मत communist turned centralist लेखक जॉर्ज ओरवेल याचेही आहे. जॉर्ज ओरवेलणे जेवढे साम्यवाद्यांचे वाभाड़े काढले असावे तेवढे कुणीही काढले नाही. राष्ट्रवादाविषयी म्हणजेच Nationalism विषयी ते म्हणतात, Nationalism trumpets its county's virtues, denies its deficiencies and contemptuous towards virtue of other countries. याचाच अर्थ राष्ट्रवाद हा देशातील उणीवांकड़े सपशेल दुर्लक्ष करीत आपल्या देशाचे गोडवे गाण्यात मशगुल असतो. पुढे बार्लेट नावाचा विचारवंत म्हणतो, Patriot is proud of his country for what it does and Nationalist is proud of his country no-matter what it does.
यावरून आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रवाद हा थोडा जहाल वाटतो. आणि देशभक्ति ही मवाळ. ( ह्यात स्त्रीवादी लोक आक्षेप घेउ शकतात. (गमतीचा भाग.) ) खरेतर आत्यंतिक जहाल व अतिशयोक्तिपूर्ण असा राष्ट्रवाद हा काही कारणांसाठी उपयुक्त आहे. मात्र हा तेवढाच विध्वंसक. ह्यातून Xenophobia म्हणजेच इतर राष्ट्रंमधील लोकांचा तिरस्कार निर्माण होतो. तो धार्मिक, जातीय, वांशिक कुठल्याही प्रकारचा असू शकतो. ह्याचे मुख्य उदाहरण म्हणजे हिटलर व त्याचे जर्मनी. पाश्चात्य देशांच्या इतिहासात नजर फिरविता आपणास लक्षात येईल की जहाल व अतिशयोक्त राष्ट्रवादाचा उपयोग हा जुलुमी धार्मिक, धर्मांधांची सत्ता उलथावण्यास वापरण्याचे साधन होते. जगाच्या इतिहासात अगदी आयसीसचे उदाहरण घेतले तरी समजेल की धार्मिक राष्ट्रवादाचे धोरण पत्करल्यास मर्यादा येतात. उलट वैश्विक एजेंडा घेउन धर्माच्या नावाखाली जुलुम करने सोपे असते. मात्र काही ठिकाणी उलटे होते व त्याचे परिणाम उलट होत असतात.
अमेरिकेत राष्ट्रवाद हा व्यक्तिसापेक्ष झालेला जास्त दिसून येतो. जर बुशला तो सत्तेत असतांना तुम्ही विरोध केलात तर तुम्ही Anti-National ठरविले जातात. अलगोर अशेच बदनाम झाले. अलगोर यांनी वैश्विक विचारांच्या जोरावर निवडणुक मारून नेण्याचा विचार केला होता. त्यावर एरिक होब्स्वाम म्हणतो, The right Americans are the right Americans because they are not like the wrong Americans, who are not really Americans.
सोवियतमधे याउलट झाले. सोवियतमधे जो क्रेमलिनशी निष्ठावंत तो राष्ट्रवादीपण आणि तोच देशभक्तपण. Make no mistake. Otherwise your head will be on tip of my sword. खरे तर साम्यवादात ना राष्ट्रवादाला थारा आहे ना देशभक्तीला. Workers of the world unite असे बोलणारे वैश्विकतेवर जास्त विश्वास ठेवता असे माणूयात. पण loyalty ही मात्र हवी ती क्रेमलिनठायी. आणि राष्ट्रवादाचा उपयोग करणारे उजवे किंवा धर्माला आड़ करून उपयोग करणारे, ह्यांना जगात कुणी भिक सुद्धा घातलेली नाही. चर्च नामोहरम झाले. पण लोकांच्या loyalties अबाधित राहिल्या. ह्याचे श्रेय जाते त्यावेळच्या समाजसुधारक व विचारवंत यांना. मग राष्ट्र नावाची संकल्पना आल्यापासून आर्थिक राष्ट्रवाद हा धार्मिक राष्ट्रवादापेक्षा जास्त सरसतेने कार्य करतो व जबाबदार असतो हे लोकांस कळले. आर्थिक राष्ट्रवादात ना tyaranny ना oligarchy ना proletariat ना bourgeois यांची सत्ता.
इतिहासातुन शिकून राष्ट्रवाद हा उधार घ्यायचा की आपल्या स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेल्या नितिमुल्यांमधून घ्यायचा ते ठरवायला हवे. ते कसे ते आपण पुढच्या भागात बघू. भारतीय राष्ट्रवाद. व आर्थिक राष्ट्रवाद.
अमेरिकेत राष्ट्रवाद हा व्यक्तिसापेक्ष झालेला जास्त दिसून येतो. जर बुशला तो सत्तेत असतांना तुम्ही विरोध केलात तर तुम्ही Anti-National ठरविले जातात. अलगोर अशेच बदनाम झाले. अलगोर यांनी वैश्विक विचारांच्या जोरावर निवडणुक मारून नेण्याचा विचार केला होता. त्यावर एरिक होब्स्वाम म्हणतो, The right Americans are the right Americans because they are not like the wrong Americans, who are not really Americans.
सोवियतमधे याउलट झाले. सोवियतमधे जो क्रेमलिनशी निष्ठावंत तो राष्ट्रवादीपण आणि तोच देशभक्तपण. Make no mistake. Otherwise your head will be on tip of my sword. खरे तर साम्यवादात ना राष्ट्रवादाला थारा आहे ना देशभक्तीला. Workers of the world unite असे बोलणारे वैश्विकतेवर जास्त विश्वास ठेवता असे माणूयात. पण loyalty ही मात्र हवी ती क्रेमलिनठायी. आणि राष्ट्रवादाचा उपयोग करणारे उजवे किंवा धर्माला आड़ करून उपयोग करणारे, ह्यांना जगात कुणी भिक सुद्धा घातलेली नाही. चर्च नामोहरम झाले. पण लोकांच्या loyalties अबाधित राहिल्या. ह्याचे श्रेय जाते त्यावेळच्या समाजसुधारक व विचारवंत यांना. मग राष्ट्र नावाची संकल्पना आल्यापासून आर्थिक राष्ट्रवाद हा धार्मिक राष्ट्रवादापेक्षा जास्त सरसतेने कार्य करतो व जबाबदार असतो हे लोकांस कळले. आर्थिक राष्ट्रवादात ना tyaranny ना oligarchy ना proletariat ना bourgeois यांची सत्ता.
गांधी बाबा कि जय! आर्थिक राष्ट्रवाद गांधींनंतर उपाशीपोटी मेला. आणि आता कोणी त्याच्या वाटेला जात नाही कारण लोकांच्या जाणीवा आणि अपेक्षा वैश्विक झाल्या आहेत. (असे त्यांना वाटते)
ReplyDeleteAfter reading your article carefully I want to ask you a question whether you want to say that History of 2nd world war will repeat? Article was useful in true sense but today's Nationalism is not against globalisation but is crises of Identity
ReplyDelete