आज मनाने पुन्हा एकदा उसळी घेतली.
एकीकडे सभोवताल गणरायाच्या आगमनाने चैतन्यात न्हावुन निघत असतांना..
ह्याला आलेली संधी समजुन दारुचा सडा रस्त्यावर बेधुंद नाचगाण्याचे थैमान घालत असतांना..
जमीन पुरेशा पावसाअभावी थुंकी गिळत असतांनाही..
अशा रुक्ष वातावरणात मन उसळी घेत होते. हे विचित्र होते. आजचा दिवस नेहमीसारखा नव्हताच. खरंतर नेहमीसारखा कधीच नसतो. परंतु जे काही घडायचे असेल ते आश्चर्यकारक नसते.
आज कितीही उसळी घेतली तरी याची खात्री होती, की आज एवेरेस्ट सर करण्याचेही ध्येय नव्हते. मग अशी उथळ उसळी हवी कशाला? तिला काय महत्व? त्याने आपलाच दर्जा खालावतो.
व. पु. म्हणाले होते ना,
"आपत्ती पण अशी यावी, की तिचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये. चांगले दोन हजार फूटांवरून पडावे. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल."
आज पडलो मी परंतु ठेच लागून. म्हणजे हात-पाय मोडतील, चेहऱ्याचा नक्षा बदलेल असा. परंतु अश्या पडण्यात काय अर्थ? खरंतर आज दोन हजार काय, पंचवीस हजार फुटांवरून पडू शकलो असतो. ते मला आवडले असते. पण तुम्हाला हवेच तसे होणार असे नसते कधीच.
ह्या विचित्र उसळीला जरा विशेष रूप देऊन प्रोडक्टिव करावे म्हणून इंडियन ओशीयनची गाणी ऐकत बसलो. बन्दे, चरखा, बेहने दे इत्यादि. ह्या गाण्यांत माणसाच्या दोन्ही टोकाच्या अभिव्यक्ति व्यक्त होतात. एक विध्वंस, संपलेली व्यक्ति आणि त्याउलट तीच व्यक्ति आशेचा किरण शोधतांना. नुसता किरण, मार्ग सापडत नाही तर इतरांना त्याने पत्करलेला मार्ग स्विकरावासा वाटतो. असा प्रयत्न मात्र आपण कधीच करत नाही. नविन मार्ग चोखाळण्यात अनिश्चितता असते, असुरक्षितता असते, जोखिम असते. आणि आपल्याला हेच नको असतं. का? तर त्याविषयीची 'भीती'. ही भीती आपल्या सगळ्या आशा-आकांक्षा संपवते. एका फ्रंट वर पडलो म्हणून दुसरीकडेही हार मानने हे आपल्याला आपली 'भीती' शिकवते. काश्मीर फ्रंट वर लीड मिळत नव्हती म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी लाहौर मधून नविन फ्रंट उघडली नसती तर आपल्या इतिहासात आपली पाकिस्तान विरुद्ध एक हार कोरली गेली असती. जे पाकिस्तानच्या अस्तित्वापर्यंत आपल्याला सलत राहिले असते. सालं अशीच सल मनात ठेऊन जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा दुसऱ्या फ्रंटवर लढणे कधीही गौरवास्पद! सोपे अजिबात नाही जात. इतरांशी दिलेला लढा देणे हे सोपे असते. परंतु स्वताशी लढतांना खरी परीक्षा असते. कारण स्वताच्या उणीवा काढण्यात खरी एनर्जी खर्च होते. स्वतःत इन्व्हेस्ट करणे अवघड जाते. कारण इथे 'स्टेज ऑफ़ डिनायल' तयार झालेली असते. इतरांच्या चष्म्यातून स्वतःला सतत बघत राहिल्यामुळे स्वतःतल्या गुण दोषांसकट सगळ्यांचा विसर पडतो. तुम्ही जगातली सर्वोत्कृष्ट 'कॉपी कँट' नाही बनू शकत. ह्या गुण-दोषांचा साक्षात्कार कधी होतो तर तो एकटं रहायला शिकल्यावर. स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा आहे. कालीदेवीच्या मंदिरात पूजा सूरु असते. स्वामीजी, तेव्हाचा नरेन्द्र बाहेर एक दगडावर शुन्यात बघत असतो. तेवढ्यात त्याचा सहकारी महेंद्र तिथे येतो. नरेन्द्रला विचारतो, "अरे नरेन्द्र तू पूजेला नव्हतास? इथे काय करतोय?". नरेन्द्र म्हणतो, "हे ढोंग आहे. मला नाही जमत." "अरे असं कसं म्हणतोस तू? परमहंसजी म्हणतात सगळी पृथ्वी एकाच चैतन्याने बनालिये. त्या मुर्तितिल आणि आपल्यातील चैतन्य एकच!" शेजारून जाणाऱ्या गाढवाकड़े बोट दाखवत स्वामी म्हणतात, " तुझ्यातलं आणि त्या गाढवातलं चैतन्य एक असेल. माझ्यात नाही." स्वामीजी खरेच होते तेव्हा. स्वतःत ते चैतन्य स्वतःच फुलवणे गरजेचे असते. असो.
एकटं रहायला शिकणे हे खुप अवघड असते. एव्हरेस्ट पार करणे आजकाल त्यापेक्षा सोपे होउन बसले आहे. एकटं रहाणे म्हणजे इतरांना टाळणे नव्हे. तर स्वतःला ओळखायला वेळ देणे. ते माझ्यासारख्या लोकांत आवडणाऱ्या लोकांना सोपे मुळीच नसते. स्वतःसोबतचा हा लढा असतो. अगदी अवघड. काही वेळेस मी ह्या अमुक अमुक व्यक्तीसाठी इतके केले आणि मला काय मिळाले? असे प्रश्न येतात. आणि त्याचा माज डोक्यात शिरू लागतो. त्या माजाचं रूपांतर विध्वंसात होतं. कारण कर्म निरपेक्ष असावं ह्या गीतेत सांगितलेल्या एकमेव गोष्टिशी मी सहमत आहे. काही वेळा आपल्या जवळची लोकही सोबत नसतात, तेव्हा तर प्रत्येक क्षण हा एक वर्षासारखा भासतो. कसं लढणार? कसं ओळखणार स्वतःला? पण हीच संधी असते. ही दवडली तर ती मिळवण्यास पुन्हा पडा, पुन्हा झगडा, पुन्हा बळ एकटवा, पुन्हा उभे रहा, पुन्हा लढा!
पण मी एकटा वेळ घालवायला शिकलो.
हेच माझ्यासाठी ध्यान. हीच विपश्यना.
आता पुन्हा लोकांत. पण तो स्वतःला ओळखून. आता जगणं अवघड नाही.

Ekant! It is addictive... Chhan lihilay!
ReplyDeleteoverall hech sangu shakto ki , EKDAM BHARII !!
ReplyDeleteThis is so relatable! Beautifully expressed. :) Keep writing please.
ReplyDelete