(भाग १)
रोजच्या जगण्यातली मजा गेलीये की काय?
कालपरवा पर्यंत वाचनास वेळ मिळत होता म्हणून कदाचित भोवताली घडणार्या घटनांची तीव्रता हवी तेवढी जाणवत नसावी. कारण वाचनात फिक्शन असो किंवा नॉनफिक्शन रम्यता अधिक असते, माणूस ( खरे तर मीच ) एवढा गढून जातो की तद्न मटेरिअलििस्टक घटनांकडे दूर्लक्ष करणे स्वभावातच उतरते. भोवतालच्या चांगल्या-वाईट घटनांतून सुसाट बाहेर पडणार्या प्रारणांनाही ते ‘रम्य՚ वलय भेदणे कठीण होऊन बसते. दूर्दैवाने जर वाचनही मागे पडले तर िनर्माण होतो फक्त हलकल्लोळ. मग भयावह उदासीनता आणि मग नैराश्य...
परंतू पुस्तकांतून बाहेर डोकावल्यास उर्वरीत जगाकडे बघण्यासाठीचा योग्य तो दृष्टिकोन हँंगओव्हरमुळे काही केल्या लवकर मिळवता येत नाही. अगदीच म्हणजे दैनिक वर्तमानपत्रातील काही गंभीर मजकूर वाचतांनाही नरेटिव्ह स्टोरीचा फील येतो. खरे तर एखादी गंभीर बाब गोष्ट स्वरूपात ऐकल्यास चटकन कळते. पण ती कळण्यापुरताच मर्यादीत असावी, त्याने संवेदना बोथट होत असल्यास ते हानीकारकच आहे. इतिहास वाचतांना विशेषतः स्वातंत्र्य चळवळीचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा, आणिबाणी विरोधातील आंदोलनाचा अगदीच देशाबाहील क्षितीजावर नजर फेकल्यास पहिल्या-दूसर्या महायुद्धाचा, चीनच्या डंग-शिओ-फंग नेतृत्वाखालील बदलांचा, दक्षिण-पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांच्या प्रगतीचा, फिडेल-चे यांच्या क्रांतीचा, बर्लिनची भिंत पडण्याचा आणि अशा अनेक १९९० च्या पूर्वी घडलेल्या जागतिक महत्व असलेल्या घटनांचा, ह्या सर्व घटनांचे साक्षीदार असणारे किती सुदैवी, त्यांनी प्रत्यक्ष जगाचा-देशाचा कायापालट होतांना बघितलं, असा विचार अलगद मनाला स्पर्श करून जातो. परंतू हा बदल कालसापेक्ष आहे का हो? की बदल काही काळाकरताच मर्यादीत असतो आणि काही काळासाठी षंढस्वरूप प्राप्त करतो?
तर असे नाही आहे. बदल हा कालातीत आहे, आपल्या हयातीतही तो तितकाच कार्यरीत आहे िजतका पूर्वी होता आिण भविष्यात पुढे असणार आहे. कळायला लागल्यापासून म्हणजेच बुद्धी व मन सुज्ञ झाल्यापासून पहिली महत्वाची घटना घडली ती म्हणजे ९/११ अमेरिकेवरील हल्ला. हे सगळं अमेरिकेत जरी घडले असले तरी त्याचे दूरगामी परीणाम संपूर्ण जगावर झालेत. खर्या उघडउघड दहशतवादाला इथूनच सुरवात झाली. त्यावेळेस कुठे कळले की हा दुष्ट त्सुनामी अक्राळविक्राळपणे फोफावत थेट तुमच्या-माझ्या घराच्या पायरीवर येवून ठेपेल. याची लिंक सरळ येवून भिडते ती २६/११ पर्यंत. खरे तर हे सगळे दहशतवादी आपल्याला आव्हानंच देताय जसे नसिरउद्दीन शाह ‘वेनझ्डे՚ चित्रपटात म्हणतो, “हम तो आपको ऐसेही मारेंगे आप क्या कर लोगे?“ तसेही तो खरेच बोलतोय. असो. मात्र देशातील नेतृत्व बदलाने अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या उंचवायलाच हव्यात पण कुठल्या एका देशाच्या नेतृत्वाकडून नव्हे ती लोक ‘इन द नेम अॉफ जिहाद՚ म्हणत असतील तर आपण ‘इन द् नेम ऑफ ह्युमॅनिटी՚ म्हणून तरी एकत्रपणे लढा देण्याची आवश्यकता आहे. पण हे असं म्हणणं खुपच आशावादी नाही का हो होत?
माझं स्वतःच वाक्य आहे, Over-optimism leads to hibernation.
बघा ना. प्रत्येक राष्ट्राला काही ‘व्हेस्टेड इंटरेस्ट՚ असतात की नाही? किंवा आपण त्याला ‘नॅशनल इंटरेस्ट՚ म्हणूयात.
(....क्रमशः)
No comments:
Post a Comment