पुस्तकाचे नाव : Conversations with Lee Kuan Yew (How to Build Nation)लेखक- संकलक- Tom Plate.प्रकाशक- Marshall Cavendish
मलेरियाग्रस्त असा सिंगापूर ज्याचा अवघ्या तीन वर्षात कायापालट होणे हा चमत्काराच आहे. ‘सिंगापूर’हा एक सिनेमा आहे. अतिशय रोमहर्षक, गूढ, अॅक्शन, गंभीर असा हा सिनेमा आहे. ज्याचा नायक-खलनायक व दिग्दर्शकही एकच आहे. ली कुआन यु. सिंगापूर 1967 साली मलेशियापासून वेगळा झाला. सिंगापूरची जमीन म्हणजे उजाड. दुर्दैव हे की एकही नैसर्गिक संपत्तीची स्वरूपात देणगीही नाही. निसर्गही सोबत नाही. काढला आणि फेकला अशी हालत झालेल्या सिंगापूरला गरज होती ती एका मसीहाची. ह्या मसीहा स्वरूपात आले ते 'Soft Authoritarian' ली कूआन यु. आणि बघता बघता असा काही पालटला सिंगापूर की अमेरिकेसकट चीनला तोंडात बोटे घालावी लागली. काही ठिकाणी ली पुजले गेले तर काही ठिकाणी विशेषतः पश्चिमेला लींवर कडाडून टीका झाली. तरीही पुस्तक छपाईला जाण्यापूर्वी ली टॉम यांना सांगतात.
" Tom, the book will have to have critical and negative stuff in it. I Know, don't worry about me. Just write me up exactly as you see me. Let the chips fall where they may. Tell the true story of me, as you see it. That's all I ask.''
ली आपल्या राजकीय जीवनात जेवढे आक्रमक आहेत तेवढे ते खासगी जीवनात वाटत नाही असे प्लेट म्हणतात. ली त्यांच्या Machiavellian Maneuvering म्हणजेच आपल्या विरोधकांना राखेत रूपांतरित करण्यासाठी प्रसिद्ध होते.आहेत. 23 मार्चपर्यंत वयाच्या 91 व्या वर्षीही 'Minister Mentor' म्हणून काम पाहत होते. मुलाखत देतानंाही लींची स्वतःची एक वेगळी शैली आहे. हातवारे करण्याची वेगळीच पद्धत आहे जी मुलाखत घेण्यार्यालाही मोहीत करते. म्हणूनच लींची मुलाखत घेणे किती क्लिष्ट व अवघड आहे ह टॉम सांगतात.संपूर्ण पुस्तकात लींना प्रश्न विचारत टॉमने चौफेर फटकेबाजी करण्यास भाग पाडले आहे. लींना त्यांच्यावर होणार्या टीकेवर विचारले असता ली म्हणतात, ‘‘प्रशंसा तुम्हाला कुठेही घेवून जात नाही. फक्त तुम्हाला खालीच खेचत असते. तुम्हाला तुमच्या ध्येय्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. माझ्यासाठी टीकाच खूप उपयुक्त ठरते. जी मला ध्येय्याप्राप्तीसाठी सतत जळत ठेवले.’’ पुढे पाश्चात्यांच्या टिकेवर ते म्हणतात, "Well, I think what the western world readership does not understand is that at the end of the day, I am not worried by how they judge me. I am worried by how the people I have governed judge me.''
ग्रीक साहित्यातील साळिंदर व कोल्ह्याची कथा सांगत टॉम ली यांचे महत्त्व स्पष्ट करून देतात. कोल्ह्याकडे जगण्यासाठी खूप काही गोष्टी असतात. एकात अपयश आले तरी इतर अनेक मार्ग त्याच्याकडे असतात. परंतु साळिंदरकडे एकच असे प्रभावी कारण असते ज्याच्यावर तो आपले संपूर्ण जीवन जगतो. टॉम म्हणतात कोल्ह्याप्रमाणे ली यांनी अनेक पर्याय अनुभवून बघितले. प्रयोग केले. व जनतेला असे एकच कारण दिले की त्यांचे जीवन सुरळीत होवो. हेच खरे नेतृत्व.
टॉमशी बोलतांना ली अनेक विचारधारांवर भाष्य करीत आपले काही स्वतःचे तत्त्वज्ञानपर अनुभवांवर आधारित सिद्धांत सांगतात. माओ, डेंग झिओपिंगपासून ते रोनाल्ड रेगनपर्यंत या सर्वांविषयीचे आपले मत ली सांगतात. विकास कसा साधला जातो हेही ली कुआन यु सांगतात. हे सगळे पुढील भागात पाहूयात.
No comments:
Post a Comment